नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने एक मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००३ सालच्या वर्ल्डकपमध्ये झालेला पराभव अद्यापही माजी कॅप्टन सौरव गांगुली विसरु शकत नाहीये. फायनलची ती मॅच आजही सौरव गांगुलीच्या लक्षात आहे.


सौरव गांगुलीने केला त्या मॅचचा उल्लेख


'ए सेंच्युरी इज नॉट इनफ' (A Century is Not Enough) या आपल्या आत्मचरित्रात सौरव गांगुलीने या फायनल मॅचचा उल्लेख केला आहे. या आत्मचरित्र गांगुलीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीचा खेळ आणि त्याची कॅप्टनशीपबाबत लिहिलं आहे.


... मात्र, धोनी 'या' टीमकडून खेळला


महेंद्र सिंग धोनीला टीममध्ये गांगुलीनेच आणलं होतं. धोनीचा खेळ पाहून सौरव गांगुली खूपच प्रभावित झाला होता. ज्यावेळी धोनी झारखंडकडून खेळत होता त्यावेळी गांगुलीने त्याला कोलकाताच्या टीमकडून खेळण्यास सांगितलं होतं. मात्र, धोनीने झारखंडच्या टीमकडून खेळणं पसंद केलं. त्यानंतर गांगुलीच्या कॅप्टनशीपमध्ये धोनीची टीम इंडियात एन्ट्री झाली. गांगुलीनेच धोनीला तीन नंबरवर बॅटींग करण्यासाठी प्रमोट केलं.


पहिल्या दिवसापासूनच धोनीचा चाहता


सौरव गांगुलीने आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे की, "मी अनेक वर्ष अशा खेळाडूंवर नजर ठेवली जे शांत राहून मॅच जिंकवण्यास समर्थ असतात. २००४ साली महेंद्र सिंग धोनीला मी पाहिलं आणि तो एक तसाच खेळाडू होता. मी पहिल्या दिवसापासूनच धोनीचा चाहता राहीलो आहे."



सौरव गांगुलीने २००३ वर्ल्डकप फायनलच्या आठवणी सांगताना लिहिलं आहे की, "२००३ वर्ल्डकपच्या टीममध्ये धोनी होता. त्यावेळी धोनी भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर (टीसी) होता. धोनी संदर्भात जो अंदाज मी वर्तवला होता तो एकदम योग्य होता त्यामुळे मी खूपच खूष आहे. धोनीने आज आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे."


जेव्हा धोनीने गांगुलीला दिली कॅप्टनशीपची संधी


सौरव गांगुलीने २००८ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ज्या महेंद्र सिंग धोनीने गांगुलीच्या नेत्रृत्वात आपलं करिअर सुरु केलं होतं. त्याच्याच नेत्रृत्वात गांगुलीने आपली शेवटची मॅच खेळली. नोव्हेंबर २०८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात नागपूरमध्ये खेळण्यात आलेली चौथी टेस्ट मॅच गांगुलीच्या करिअरमधील शेवटची मॅच होती. या मॅचमध्ये धोनीने गांगुलीचा आदर करत शेवटच्या ओव्हरमध्ये टीमचं नेत्रृत्व करण्याची संधी दिली होती. या घटनेचा उल्लेखही गांगुलीने एका मुलाखतीत केला होता. 


आपल्या करिअरच्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये गांगुलीने सेंच्युरी झळकावली. गांगुलीने करिअरमध्ये ११३ टेस्ट आणि ३११ वन-डे मॅचेस खेळल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने ४२.१७ च्या सरासरीने ७२१२ रन्स बनवले ज्यामध्ये १६ सेंच्युरीचा समावेश आहे.