MS Dhoni wanted to marry : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार एम एस धोणी (M S Dhoni) हा भारतीय क्रिकेट इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. टी-20 असो वा एकदिवस वर्ल्ड कप स्पर्धा असो. धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेट या सर्व प्रकारात जेतेपद पटकावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोणीची क्रिकेट कारकिर्द संपूर्ण क्रिकेट जगताला माहित आहे. पण धोणीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मात्र फारच कमी लोकांना माहित आहे. धोणी स्वत:ही आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत उघडपणे फारच क्वचित बोलतो. याबाबतीत तो मीडियापासूनही दूर रहाणंच पसंत करतो. 


पण साक्षीबरोबर लग्न करण्यापूर्वी धोणीच्या आयुष्यात एक साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतली अभिनेत्री राय लक्ष्मी (Raai Laxmi) होती हे फारच कमी जणांना माहित आहे. धोणी आणि राय लक्ष्मीच्या अफेअरच्या चर्चा चांगल्या रंगल्या होत्या. धोणीने याबाबत कधीही वक्तव्य केलं नाही, पण राय लक्ष्मीने स्वत: याबाबत वक्तव्य केलं होतं. 


महेंद्रसिंग धोणी आणि लक्ष्मीची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली होती. 2008 च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान दोघांची ओळख झाली. दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीत राय लक्ष्मी हे एक प्रसिद्ध नाव आहे. पण इतर प्रेक्षक तिला महेंद्रसिंग धोणीची एक्स गर्लफ्रेंड याच नावाने ओळखतात. राय लक्ष्मी 2008 च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्सची ब्रँड अॅम्बेसेडर होती. याचदरम्यान, धोणीची तिच्याशी ओळख झाली. इथूनच त्यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी धोणी आणि राय लक्ष्मीच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या अनेकवेळा समोर येत होत्या. पण हे प्रेमप्रकरण फार काळ टिकलं नाही. लवकरच त्यांच्यात ब्रेकअप झालं.


धोणी आणि राय लक्ष्मी यांच्यात नेमकं काय बिनसलं याचं कारण गुलदस्त्यातच राहिलं. काही महिन्यांपूर्वी राय लक्ष्मीने 'धोणीनेबरोबरचं नातं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती' असं विधान केलं होतं. या गोष्टीला अनेक वर्ष लोटली आहेत, त्यामुळे लोकांनीही याबाबतच्या चर्चा बंद करायला हव्यात असं आवाहनही तिने केलं होतं. 


राय लक्ष्मीची कारकिर्द
राय लक्ष्मीची जन्म 5 मे 1989 रोजी कर्नाटकमध्ये झाला. 2005 मध्ये तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘Karka Kasadara’ हा तिचा पहिला तामिळ सिनेमा. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला सोनाक्षी सिना हिची प्रमुख भूमिका असलेल्या अकीरा या सिनेमात तिने भूमिका साकारली होती. 'ऑफिसर अर्जुन सिंह IPS बैच 2000' या सिनेमातही तीने भूमिका साकारली होती. राय लक्ष्मी सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे.