South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकाच्या `त्रिकुटा`समोर श्रीलंकेची अपयशी झुंज; 102 धावांनी पराभव!
SA vs SL 3rd CWC Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.
South Africa vs Sri Lanka : वर्ल्ड कपचा (World Cup 2023) तिसरा सामना साऊथ अफ्रिका अन् श्रीलंका यांच्यात खेळण्यात आला होता. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने श्रीलंकेचा पराभव केला आहे. साऊथ अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केला. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेला 102 धावा करता आल्या. त्यामुळे आता साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.
वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या (highest score in world cup) साऊथ अफ्रिकन संघाने उभी केली आहे. त्यामुळे श्रीलंकन गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालंय. साऊथ अफ्रिकेने (South Africa vs Sri Lanka) श्रीलंकेविरुद्ध 428 धावा कुटल्या. त्याचबरोबर वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये 59 फोर मारले गेले. एकाच इनिंगमध्ये 3 शतक ठोकल्याचा इतिहास देखील रचला गेलाय. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock), रॅसी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) आणि एडम मार्करमच्या (Aiden Markram) यांनी शतक ठोकलं. साऊथ अफ्रिका संघाने 429 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ ढासळला.
आफ्रिकेच्या धावांचं आव्हान घेऊन श्रीलंकेचा संघ मैदानात आला अन् सुरूवातच खराब झाली. कुसल परेरा आणि पाथुम निसांका हे दोन्ही सलामीवीर फेल गेले. त्यानंतर कुसल मेंडिस याने सुत्र हातात घेतली अन् आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. मेंडिसने 8 सिक्स अन् 4 फोर खेचले. मात्र, रबाडाने श्रीलंकेची गाडी रोखली. त्यानंतर कॅप्टन दसून शकनाने शेवटी हाणामारीचा प्रयत्न केला पण तोपर्यंत दुसऱ्या बाजूने विकेटस् पडत होत्या. शनाकाची विकेट गेल्यानंतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही अन् श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील पहिला पराभव पत्करावा लागला.
साऊथ अफ्रिका : क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा.
श्रीलंका : कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (WK), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा.