Cricket Team New Coaches : येत्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ कसून तयारीला लागल्याचं दिसत आहे. टीम इंडियाही प्रत्येक मालिकेमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत बदल करून मजबूत टीम करण्याच्या प्रयत्नात आहे. आताच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. ((South Africa Cricket Team New Coaches Rob Walter & Shukri Conrad) दोन कर्णधार फॉरमॅटनुसार नेमण्यात आले आहेत. अशातच आगामी वर्ल्ड कपच्या डोळ्यापुढे ठेवत संघ व्यवस्थापनात मोठे बदल केले आहेत. (South Africa Cricket Team New Coaches Rob Walter & Shukri Conrad latest Marathi Sport Cricket News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेने कोचिंग स्टाफमध्ये नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. मार्क बाऊचर यांनी टी-20 वर्ल्ड कपनंतर प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आता आधी व्यवस्थापनाचीच बांधणी करत असल्याचं दिसत आहे. टी-20 आणि वनडे संघासाठी रॉब वॉल्टर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर शुक्री कोनार्ड यांची कसोट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. 


गतवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नेदरलँड संघाने पराभवाची धूळ चारली होती. नवनियुक्त झालेल्या प्रशिक्षकांचा कार्यकाल हा येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रॉब वॉल्टर यांनी याआधीही आफ्रिकेच्या संघासोबत काम केलं आहे. 


 



दरम्यान, कोनार्ड यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी युगांडाचं मुख्य प्रशिक्षकपद आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख, तसेच अंडर-19 संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. येत्या चार वर्षात आम्हाला अनेक कसोटी सामने खेळायचे आहेत त्यामुळे आम्ही कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी सांगितलं.