जोहान्सबर्ग : ६ वन-डे मॅचेसच्या सीरिजमधील चौथी मॅच दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. आफ्रिकन टीमने टीम इंडियाचा पाच विकेट्सने पराभव केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मॅच खूपच रोमांचक झाली मात्र, या आफ्रिकेच्या विजयासोबतच एक झटकाही बसला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...


चौथ्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे दक्षिण आफ्रिकन टीमला दंड ठोठावण्यात आला आहे. या मॅचमध्ये आफ्रिकन टीमने स्पिनर इमरान ताहिर याच्या ऐवजी नव्या बॉलरला संधी दिली होती. 


त्यामुळेच बॉलिंग टाकण्यात थोडा उशीर होत होता. आफ्रिकन टीमकडून जेपी ड्यूमिनी हा एकच स्पिनर होता तर, इतर फास्ट बॉलर होते. आता या मॅचनंतर कॅप्टन अडन मार्करमवर स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्या फिजमधील २० टक्के हिस्सा दंड म्हणून कापण्यात आला आहे. तर, इतर टीममधील प्लेअर्सच्या फिजमधील १० टक्के रक्कम कापण्यात आली आहे. 


आयसीसी मॅच अंपायर अँडी पेक्रॉफ्ट यांनी अॅडेन मार्करम आणि टीमला हा दंड ठोठावला आहे. आफ्रिकन टीमने नियोजित वेळेत एक ओव्हर कमी टाकली आणि त्यामुळेच त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.


आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या २.५.१ नुसार जर टीमच्या बॉलर्सने स्लो बॉलिंग केल्यास त्यांच्या फिसमधून १० टक्के आणि कॅप्टनच्या फिसमधून २० टक्के रक्कम कापण्यात येते.


जर दक्षिण आफ्रिकन टीमने आगामी १२ महिन्यांत पुन्हा कुठल्याही वन-डे मॅचमध्ये अॅडन मार्करमच्या नेत्रृत्वात टीमने अशीच चूक केली तर ती दुसरी चूक असेल. त्यामुळे कॅप्टनवर निलंबनाची कारवाईही होऊ शकते.