मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यास अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने अनोखी हॅटट्रिक केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे रँकिगमधील टॉप टीम, टॉप बॅट्समन आणि टॉप बॉलर या तिन्ही प्रकारात दक्षिण आफ्रिकाच आहे. 


वनडे रँकिगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी आहे. फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी ए बी डेविलियर्स आहे. तर अव्वल गोलंदाजांच्या यादीत कॅगिसो रबाडा आहे. 


वनडे रॅकिंगमधील गोलंदाजाच्या यादीत पहिल्या १०मध्ये एकाही भाऱतीय क्रिकेटपटूचा समावेश नाहीये तर फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू आहे.