कोलंबो : दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडानं क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे. रबाडानं टेस्ट क्रिकेटमध्ये १५० विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर रबाडानं हरभजन सिंगचा विक्रमही मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेची इनिंग १९६ रनवर आटोपली. यामध्ये रबाडानं महत्त्वाची भूमिका बजावली. रबाडानं १२ ओव्हरमध्ये ४४ रन देऊन ३ विकेट घेतल्या. या इनिंगच्या ४५ व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला रबाडानं दिलरुवान परेराला आऊट केलं आणि टेस्ट क्रिकेटमधल्या १५० विकेट पूर्ण केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट क्रिकेटमध्ये १५० विकेट घेणारा रबाडा हा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. याआधी हरभजन सिंगच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. हरभजननं २००३ साली २३ वर्ष आणि १०६ दिवसांचा असताना हरभजननं हे रेकॉर्ड केलं होतं. रबाडानं २३ वर्ष आणि ५० दिवसांमध्येच १५० विकेट घेतल्या आहेत. या मॅचमध्ये रबाडानं एकूण ७ विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये रबाडाला ४ तर दुसऱ्या इनिंगमध्ये ३ विकेट मिळाल्या. पहिल्या इनिंगमध्ये रबाडानं १४ ओव्हरमध्ये ५० रन देऊन श्रीलंकेच्या ४ विकेट घेतल्या.


दक्षिण आफ्रिकेचा पाचवा खेळाडू


रबाडानं ३१व्या टेस्टमध्ये १५० विकेट घेतल्या. हे रेकॉर्ड करणारा रबाडा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा खेळाडू बनला आहे. एच जे टायफिल्ड आणि डेल स्टेननं सर्वात जलद १५० विकेट घेतल्या. या दोघांना १५० विकेट घेण्यासाठी २९ टेस्ट लागल्या. तर डोनाल्ड आणि शेन पोलॉकनंही टेस्टमध्ये १५० विकेट घेतल्या. हे रेकॉर्ड करायला डोनाल्डला ३३ आणि पोलॉकला ३६ टेस्ट लागल्या.