सेंच्युरिअन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधली दुसरी टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. २८ रन्सची आघाडी मिळाल्यावर बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहेत. या दोन्ही विकेट जसप्रीत बुमराहनं काढल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कोअर बोर्डवर फक्त १ रन असताना मारक्रम तर स्कोअर ३ रन्स असताना हाशीम आमला आऊट झाला. यानंतर आता एबी डिव्हिलियर्स आणि डिन एल्गार यांनी दक्षिण आफ्रिकेची इनिंग सावरायला सुरुवात केली आहे.


दक्षिण आफ्रिका पहिल्या इनिंगमध्ये ३३५ रन्सवर ऑल आऊट झाल्यावर भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला २८ रन्सची आघाडी मिळाली.


विराट कोहलीच्या १५३ रन्सच्या खेळीमुळे भारताला ही धावसंख्या गाठता आली. विराटनं २१७ बॉल्सच्या या इनिंगमध्ये १५ फोरचा समावेश होता. विराटचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २१वं शतक आहे.


दक्षिण आफ्रिकेकडून मॉर्नी मॉर्कलनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर केशव महाराज, वर्नन फिलँडर, कागीसो रबाडा आणि एनगीडीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.


दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था १८३/५ अशी होती. विराट कोहली ८५ रन्सवर तर हार्दिक पांड्या ११ रन्सवर खेळत होता. पण हार्दिक पांड्या १५ रन्स करून आऊट झाला. पांड्या आऊट झाल्यावर आर. अश्विननं विराटला चांगली साथ दिली. अश्विननं ५४ बॉल्समध्ये ३८ रन्स केल्या.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा