वर्ल्ड कपमधून दक्षिण आफ्रिका बाहेर? नेमकं काय आहे कारण जाणून घ्या!
क्रिकेट विश्वातून टी-20 वर्ल्ड कपआधी मोठी बातमी...
Sport News : सध्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे वारे वाहू लागले आहेत, अशातच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्याचं कारण म्हणजे आफ्रिकेचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडत आहे. भारताविरूद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये आफ्रिकेच्या झालेल्या पराभवाने तर आणखीनच अडचण झाली आहे. (South Africa out of the ODI World Cup 2023? sport marathi news)
पुढच्या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला स्थान मिळू शकत नाही. सुपर लीग पॉइंटटेबलमध्ये संघ 11 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विश्वचषकासाठी 8 संघ पात्र ठरतील त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पॉइंट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर इग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे पहिल्या आठमध्ये आहेत.
दक्षिण आफ्रिकेला आता 8 मध्ये येणं अवघड मानलं जात आहे. कधीकाळी आफ्रिकेचा संघ हा बलशाली म्हणून ओळखला जात होता. कारण संघामध्ये एक से बढकर एक खेळाडू होते. बॉलिंग, बॅटींग आणि फिल्डिंगमध्ये उदाहरण म्हणून दाखवलं जाईल असा संघ आता 8 मध्ये नाही.
दरम्यान, येत्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही आफ्रिकेचा युवा संघ आहे. त्यामुळे संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. 16 ऑक्टोंबरला टी-20 वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात होणार आहे.