मुंबई : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होतेय. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. ही 5 मॅचची सीरिज 9 ते 19 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. निवड समितीने या सीरिजसाठी एका वेगवान गोलंदाजाला संधी दिली आहे. (south africa tour india 2022 ind vs sa t20 series arshdeep singh)


दक्षिण आफ्रिकेच्या डोकेदुखीत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा युवा वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरु शकतो. हा बॉलर डेथ ओव्हरमध्ये भेदक आणि यॉर्कर टाकण्यात एक्सपर्ट आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात या बॉलरने उल्लेखनीय कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावरच या गोलंदाजाची आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली.


निवड समितीने अर्शदीप सिंहवर विश्वास दाखवत संधी दिली आहे. अर्शदीपने 15 व्या हंगामातील 13 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. मात्र अर्शदीपमध्ये 'वाइड यॉर्कर' आणि 'ब्लॉक-होल'मध्ये बॉलिंग करण्याची क्षमता अफाट आहे. त्यामुळे आता आफ्रिकेविरुद्ध अर्शदीप कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.


टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.


टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.