SA vs AUS World Cup semifinal : वर्ल्ड कपच्या आधी साधं नाव सुद्धा ज्या टीमचं घेतलं जात नव्हतं, अशा साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये राडा घातला. साखळी फेरीत फक्त सात विजयासह सेमीफायनल गाठणाऱ्या साऊथ अफ्रिकेला आता टाटा गुड बाय म्हण्याची वेळ आलीये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात कांगारूंनी साऊथ अफ्रिकेची विकेट काढली. त्यामुळे पाचव्यांदा साऊथ अफ्रिकेचं स्वप्नभंग झालं. सेमीफानयलमधील पराभवानंतर त्यांच्यावरील चोकर्सचा टॅग कायम राहिल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सेमीफायनलमध्ये साऊथ अफ्रिकेने ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाला एकाएका धावेला झुंजवलं.. ते पाहून साऊथ आफ्रिकन गोलंदाजांचं कौतूक करावं तितकं कमी... साऊथ अफ्रिकेच्या तोंडासमोर पराभव दिसत असताना देखील खेळाडूंनी आशा सोडल्या नाहीत. मन हळवं होत होतं. सामना हातातून गेला होता. मात्र, शरीर लढण्याची ताकद देत होतं. सामना अंतिम टप्प्यात आला अन् साऊथ अफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर साऊथ अफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आल्याचं पहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 45 व्या ओव्हरमध्ये भावूक क्षण पहायला मिळाला. मार्कराम आपल्या संपूर्ण ताकदीसह गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मार्करामचा बॉल टर्न झाला. मात्र, स्टंप्सला लागला नाही. त्यावेळी मार्करामने खाली बसून डोक्याला हात लावला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचं स्पष्ट दिसत होतं. मार्करामला पाहून आपल्या करियरमधील शेवटचा सामना खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचे डोळे देखील पाणावले. 



साऊथ अफ्रिकेचं काय चुकलं?


महोरक्याच नीट खेळत नसले, तर टीमने कोणाकडे बघायचं? असा सवाल टेम्बा बावुमाकडे पाहून तुम्हालाही पडला असेल. साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फेल गेला. आजच्या सामन्यात देखील त्याला भोपळा फोडता आला नाही. तर क्विंटन डी कॉकला अंतिम सामन्यात चांगला खेळ दाखवता आला नाही. साऊथ अफ्रिकेचे सुरूवातीच्या चारही फलंदाजांनी घाई केली अन् विकेट्स थ्रो केल्या. मिलर झुंजला खरा, मात्र.. त्याला साथ काही मिळाली नाही. गोलंदाजी करताना भारतासारखं प्रेशर तयार करायला साऊथ अफ्रिकेला जमलं नाही. उलट ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेवर घाव घातला. मात्र, सामना पलटला खरा तो पावसानंतर, साऊथ अफ्रिकेने आक्रमक रणनिती आखली अन् त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. किरकोळ टार्गेट ऑस्ट्रेलियाला 16 बॉल राखून पार करता आलं, यातच लढव्य्या साऊथ अफ्रिकेचा विजय आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.