मुंबई : खेळाच्या मैदानावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मॅन ऑफ दी मॅचचा खिताब दिला जातोय. विविध देशांमध्ये हा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूला विविध प्रकारचे बक्षिस दिले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाना येखील एका लीगमध्ये मॅन ऑफ दी मॅचचा खिताब पटकावणाऱ्या खेळाडूला चपलांचा जोड दिला जातो. तर बोस्टवानामध्ये हा खिताब पटकावणाऱ्या खेळाडूला बादलीभरुन घरातील सामान दिले जाते.


झिम्बाब्वेममध्ये तर खेळाडूंना बीअरच्या क्रेटससारखे देखील बक्षिस दिले जाते. यातच वेगळे काही करण्याचा प्रयत्न म्हून दक्षिण आफ्रिकेतील एका फुटबॉल लीगमध्ये सामन्यानंतर प्लेयर ऑफ दी मॅचचा खिताब पटकावणाऱ्या खेळाडूला चक्क ५ जीबी डेटा देण्यात आलाय. 


दक्षिण आफ्रिकेती टेलिकॉम कंपनी टेल्कॉमने ममेलोवी सनडाऊंसचा कर्णधार लोम्‍फो केकानाला हे बक्षिस मिळाले. त्याचा फोटो ट्विटरवर व्हायरल होतोय आणि युझर्सही त्याची खिल्ली उडवतायत.