जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जेपी ड्युमिनी याने स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सीएसए टी-२० चॅलेंजच्या सेमी फायनलमध्ये ड्युमिनीची टीम केप कोब्रासचा वॉरियर्सनी पराभव केला, यानंतर ड्युमिनीने हा निर्णय घेतला आहे. स्थानिक क्रिकेटमधून निवृत्त व्हायचा ड्युमिनीचा निर्णय इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपच्या काही दिवस आधी आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी ड्युमिनीने सप्टेंबर २०१७ साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसंच इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपनंतर ड्युमिनी वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होणार आहे. असं असलं तरी ड्युमिनी आंतरराष्ट्रीय टी-२० आणि जगभरातल्या टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल.


या मोसमात ड्युमिनीचा बहुतेक काळ हा उजव्या खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरण्यात झाला. केप कोब्राजकडून ड्युमिनी ३ मॅच खेळला. १०७ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ड्युमिनीने ६,७७४ रन केल्या आहेत, यामध्ये २० शतकं आणि २ द्विशतकांचा समावेश आहे. तर लिस्ट ए मध्ये ड्युमिनीने २६९ मॅचमध्ये ३८.७८ च्या सरासरीने ७,४०८ रन केले.


दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कपसाठी निवड केलेल्या १५ सदस्यीय टीममध्ये ड्युमिनीची निवड करण्यात आली आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपची पहिलीच मॅच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे.


दक्षिण आफ्रिकेची टीम


फॅप डुप्लेसिस (कर्णधार), क्विंटन डिकॉक, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, डेल स्टेन, एन्डिले पेहलुक्वायो, इम्रान ताहीर, कागिसो रबाडा, ड्वॅन प्रिटोरियस, एनरिच नॉर्टजे, लुंगी एनगीडी, एडन मार्करम, रसी वेड डसेन, हाशीम आमला, तबरेज शम्सी