World Cup 2023 : सुपरस्टार रजनीकांत यांची भविष्यवाणी! Ind vs Aus मध्ये कोण जिंकणार?
World Cup 2023 : सुपरस्टार रजनीकांत आणि पत्नी लता हे भारत विरुद्ध न्यूझीलंडचा विश्वकप 2023 चा पहिला सेमी फायनल सामना पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. मॅच पाहिल्यानंतर चेन्नईला पोहोचलेल्या सुपरस्टारने सांगितले की, वर्ल्डकप 2023 ची फायनल कोण जिंकणार.
प्रत्येकजण 19 नोव्हेंबर च्या फायनलची मनापासून वाट पाहत आहे. कारण याच दिवशी रविवारी दुपारी 2 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये वर्ल्ड कप 2023 चा अखेरचा सामना रंगणार आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना रंगणार आहे. 15 नोव्हेंबरला मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर सेमी फायनलाचा सामना रंगला. भारताने न्यूझीलंडला हरवून फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. या दिवशी वानखेडेत अनेक फिल्मी कलाकार उपस्थित होते. सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शाहिद कपबक, रणबीर कपूर सह अनेक कलाकार उपस्थित होते. या नावात रजनीकांत यांचाही समावेश होता. या दरम्यान रजनीकांत यांनी फायनल मॅचबाबत मोठं वक्तव्य केलं.
काय म्हणाले रजनीकांत?
रजनीकांत म्हणाले, 'सुरुवातीला मला नर्व्हस वाटले. नंतर विकेट पडत राहिल्या आणि सगळं सुरळीत झालं. त्या दीड तासात मी खूप घाबरलो होतो, पण मला 100% खात्री आहे की (वर्ल्ड) कप आमचाच आहे. उपांत्य फेरीचा सामना पाहिल्यानंतर रजनीकांत यांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे की, यावेळी फक्त भारतच विश्वचषक आणणार आहे. रजनीकांत सांगतात, 'पहिल्यांदा मी सेमीफायनलमध्ये नर्व्हस होतो, पण नंतर जेव्हा विकेट पडत राहिल्या तेव्हा सगळं सुरळीत झालं. त्या दीड तासात मी खूप घाबरलो होतो, पण मला १००% खात्री आहे की विश्वचषक आमचाच आहे. उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी रजनीकांत वानखेडेवर पोहोचले होते. रजनीकांत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना पाहताना दिसला. न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत भारताने अंतिम फेरी गाठली आहे.
रजनीकांतचा आगामी चित्रपट
सुपरस्टार रजनीकांत शेवटचा दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमारच्या 'जेलर' मध्ये दिसला होता, जो 2023 च्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. अभिनेत्याने 'जय भीम' फेम टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित आगामी 'थलावर 170' चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण केले आहे.
सामना बघायला जाऊ शकतात थलायवा
आता थलायवासोबतच अनेक दिग्गज व्यक्ती या विश्वचषक सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता खेळला जाईल. यावेळी भारताची स्पर्धा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताला प्रोत्साहन देण्यासाठी रजनीकांतही स्टेडियममध्ये जाणार असल्याचे मानले जात आहे.
मुलीच्या सिनेमात करणार कॅमिओ
रजनीकांत लेक ऐश्वर्याचा आगामी सिनेमा 'लाल सलाम'मध्ये कॅमिओ करणार आहेत. हा सिनेमा पोंगल 2024 दरम्यान सिनेमागृहात रिलीज होणार आहे. याच दरम्यान लोकेश कनगराज यांचा 'थलाइवर 171' देखील प्रदर्शित होणार आहे.