Asia Cup: भारतीय क्रीडाप्रेंमीसाठी खुशखबर, टीम इंडिया थेट एशिया कपच्या अंतिम फेरीत खेळणार
Asia Cup 2023: भारतीय संघाने एशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम फेरीत स्थान पटकावलं आहे. येत्या 11 जूनला स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार असून क्रीडा प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Junior Asia Cup 2023: भारती ज्युनिअर महिला हॉकी (Indian Junior Women Hockey Team) संघाने इतिहास रचला आहे. ज्युनिअर एशिया कप 2023 (Junior Asia Cup 2023) च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने यजमान जपानचा पराभव करत थेट थेट फायनलमध्ये (Final) धडक मारली आहे. टीम इंडियाने जपानचा 1-0 असा पराभव केला (India Beat Japan). भारतातर्फे सुनिलिता टोप्पोने सामन्याला एकमेव गोल केला. तोच गोल निर्णायक ठरला. ज्युनिअर एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी 2012 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.
या विजयाबरोबर भारतासाठी आणखी एक चांगली बातमी म्हणजे भारतीय संघाने ज्युनिअर हॉकी महिला वर्ल्ड कप 2023 मध्ये क्वालिफाय केलं आहे. 29 सप्टेंबर ते 10 डिसेंबर 2023 दरम्यान चिलीमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे.
टीम इंडियाचं वर्चस्व
सेमीफायनलमध्ये यजमान जपानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं. जपानने भारतीय संघाच्या खेळाडूंवर सामन्याच्या सुरुवातीपासूनच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. जपानला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले पण भारताच्या भक्कम बचावापुढे त्यांना गोल करण्यात अपयश आलं. त्यामुळे सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दुसऱ्या हापमध्ये दोनही संघांनी आपला खेळ आक्रमक केला. गोलच्या दिशेने दोनही संघांच्या खेळाडूंनी अनेक चाली रचल्या. जपान दोन वेळा गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचले. पण भारताची गोलकिपर माधुरी किंडोने दोनही वेळा जबरदस्त बचाव करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
सामन्याच्या शेवटपर्यंत गोलशुन्य
सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने चेंडू आपल्याकडेच ठेवत भारतीय संघावर दबाव वाढवला. जपानच्या आक्रमणापुढे भारतीय संघ काहीसा बॅकफुटवर गेला. यादरम्यान भारतीय संघाला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारतीय संघाला अपयश आलं. त्यामुळे सामन्याचा तिसरा क्वार्टरही गोलशुन्य राहिला.
भारतीय संघाने करुन दाखवलं
सामन्याचा चौथा क्वार्टर सुरु झाल्यानंतर मात्र भारतीय संघाने जपानला बॅकफूटवर ढकलत चेंडूवर ताबा मिळवला. भारतीय खेळाडूंच्या आक्रमक खेळामुळे यजमान जपनावर दबाव वाढला. याचा फायदा घेत भारताच्या सुनीा टोप्पोने शानदार गोल केला. या गोलमुळे भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळाली. सामन्याच्या शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत भारतीय संघाने यजमान जपानला त्यांच्याच मैदानात धूळ चारली. आता महिला ज्युनिअर एशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनला खेळवला जाणार आहे. चीन आणि कोरियातील विजेत्या संघाबरोबर टीम इंडिया चॅम्पियनशीपसाठी भिडेल.