एअर स्ट्राईकनंतर भारतीय खेळाडूंचा वायुसेनेला सलाम
भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले.
मुंबई : भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये ३५० च्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. भारतीय वायुसेनेच्या 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एअर स्ट्राईक केला.
भारतीय वायुसेनेच्या या कारवाईनंतर भारतीय खेळाडूंनी भारतीय वायुसेनेचं कौतुक केलं आहे. तसंच भारतीय वायुसेनेबद्दल अभिमानही व्यक्त केला आहे. आमच्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजू नका असं, सचिन तेंडुलकर म्हणाला आहे.
सुधरा, नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने सुधारण्यास भाग पाडू, अशी तंबी सेहवागनं पाकिस्तानला दिली आहे.
भारतीय वायुसेनेला सलाम... शानदार... भारतानं प्रत्युत्तर दिलं, असं ट्विट मोहम्मद कैफनं केलं.
'भारतीय वायुसेना बहोत हार्ड, बहोत हार्ड' असं युझवेंद्र चहल म्हणाला.
भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं भारतीय वायुदलाला सलाम केला.
गौतम गंभीरनं जय हिंद, असं ट्विट केलं.
एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख नेते मारले गेले आहेत. यामध्ये अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर यांचा समावेश असल्याचे समजते. एवढच नाही तर या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रांचा अगणित साठा पूर्णपणे बेचिराख झाला आहे.