नवी दिल्ली : भारताचा धावपटू मोहम्मद अनासनं चेक रिपब्लिक इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. मोहम्मदनं चारशे मीटर शर्यतीत ४५.२४ सेकंदांचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यानं यापूर्वी याच वर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ४५.३१ सेकेंदांच्या वेळेची नोंद केली होती. विशेष म्हणजे 1958 नंतर मिल्खा सिंग यांच्यानंतर कॉमनवेल्थ गेम्समध्ये अंतिम फेरीत धडक मारणारा भारताचा धावपटू मोहम्मद अनास हा पहिला धावपटू ठरला आहे.


मिल्खा सिंग यांनी कार्डिफमध्ये १९५८मध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. तर महिलांमध्ये भारताच्या एम.आर.पूवाम्मा हिनं चारशे मीटर शर्यतीत ५३.०१ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवलं. तर राजीव अरोकियानं २०.७७ सेकंदांची वेळ नोंदवत २०० मीटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला.