SRH vs MI : एक चूक आणि एका ओव्हरमध्ये मुंबईने गमवला सामना
टीम डेविडने क्रिझवर कमी बॉलमध्ये जास्त धावा काढल्या.
मुंबई : हैदराबाद विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या क्षणी मुंबईला पराभव स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही. खूप छोट्या चुकांमुळे मुंबई टीमने थोडक्यासाठी सामना हातून गमवला. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये गेम पलटणार असं वाटत असताना डेविड आऊट झाला आणि सामना हातून गेला.
क्रिझवर बुमराह आला. मात्र त्याला भुवनेश्वर कुमारचे बॉल खेळणं कठीण जात होतं. अखेर मुंबईला 3 धावा विजयासाठी कमी पडल्या आणि हैदराबाद सामना जिंकलं. या सामन्यानंतर त्यांच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत. आता शेवटच्या सामन्याकडे लक्ष असणार आहे.
हैदराबाद टीमकडून राहुल त्रिपाठीने 44 बॉलमध्ये 76 धावा केल्या. रियाम गर्गने 42 धावा केल्या तर निकोलस पूरनने 38 धावांची खेळी केली. हैदराबादने 6 गडी गमावून 193 धावा केल्या. मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य होतं.
टीम डेविडने क्रिझवर कमी बॉलमध्ये जास्त धावा काढल्या. त्याने 114 मीटर लांब सिक्सही ठोकला. टीम डेविडने एक धावा काढण्याचा निर्णय चुकला. जर त्यावेळी एक रन काढली नसती तर कदाचित चित्र वेगळं ठरू शकलं असतं.
लक्ष्याचा पाठलाग करताना 17 व्या ओव्हरपर्यंत सामना हातून जाईल असं वाटत होतं. मात्र डेविडने कमाल केली. त्याने सामना जिंकण्याच्या आशा जागवल्या. मात्र टीम डेविड रनआऊट झाला त्यामुळे मुंबईच्या विजयाचं गणित बिघडलं.
रोहित शर्माने विजयानंतर सांगितलं की, चांगला प्रयत्न केला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये गडबड झाली नाहीतर सामना जिंकणं शक्य होतं. जे झालं त्यातून पुन्हा या चुका न होण्यासाठी प्रयत्न करून पुढे जायचं असं रोहित शर्मा मॅचनंतर म्हणाला.