श्रीलंकेची २०१९ वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेशाची संधी धुसर
टीम इंडियाकडून चौथ्या वनडे सामन्यात १६८ रन्सने पराभव झाल्यानंतर श्रीलंकेच्या टीमसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्डकपसाठी थेट निवड होण्याच्या श्रीलंका टीमच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे.
दुबई : टीम इंडियाकडून चौथ्या वनडे सामन्यात १६८ रन्सने पराभव झाल्यानंतर श्रीलंकेच्या टीमसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्डकपसाठी थेट निवड होण्याच्या श्रीलंका टीमच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे.
श्रीलंकेला वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी भारत विरूद्ध खेळत असलेल्या पाच वन डे सीरीजपैकी कमीत कमी दोन सामने जिंकणे गरजेचे होते. मात्र त्यांना तसं करता आलेलं नाही. ते या सीरीजमध्ये ४-० ने मागे आहेत. वर्ल्डकपसाठी यावेळी इंग्लंडसह आयसीसी रॅंकींगमधील पहिल्या सात टीम्सना थेट प्रवेश मिळणार तर बाकी टीम्सना क्वालिफाय राऊंड खेळावे लागतील. आता वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळवण्याची श्रीलंकेची संधी जवळपास गेली आहे.
आयसीसीच्या माहितीनुसार, भारताकडून सीरीजमध्ये दमदार मात मिळाल्यानंतर आता श्रीलंकेला वेस्टइंडीजच्या आगामी सीरीजमध्ये त्यांना कमीत कमी एका सामन्यात हरवावं लागणार आहे. जर तसं झालं तर श्रीलंकेला अजूनही वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळण्याची निसटती संधी आहे. जर श्रीलंका टीमने भारताविरूद्ध होत रविवारी होत आलेल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांना ८८ अंक मिळतील. पण तेही थेट प्रवेशासाठी पुरेसे नसतील.
आता वेस्टइंडिजकडे श्रीलंकेच्या समोर निघण्याची संधी आहे. जर ते आगामी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवू शकले तर त्यांनाही ८८ अंक मिळतील. वेस्ट इंडिजला सप्टेंबरमध्ये आयरलॅंड विरूद्ध सामने खेळायचे आहेत आणि इंग्लंडच्या विरूध्द १९ ते २९ सप्टेंबर दरम्यान पाच वनडे सामन्यांची सीरीज खेळायची आहे. जर भारत श्रीलंकेला ५-० ने हरवतो तर विंडीजला सुद्धा वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेशासाठी आयरलॅंडला मात द्यावी लागेल आणि इंग्लंड विरूद्धच्या सीरीजमध्ये ४-१ ने आघाडी घ्यावी लागेल.