कोलंबो : ५५० रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्के बसले आहेत. त्यामुळे आजच्या म्हणजे चौथ्याच दिवशी टेस्ट मॅच जिंकण्याची संधी टीम इंडियाला चालून आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी विराट कोहलीनं शतक झळकावल्यानंतर टीम इंडियानं डाव घोषित केला. चौथ्या दिवसाची सुरुवात १८९/३ अशी केल्यानंतर भारतानं सकाळी २४०/३ पर्यंत मजल मारली. यामुळे श्रीलंकेला विजयासाठी तब्बल ५५० रन्सची आवश्यकता असणार आहे.


विराट कोहलीच्या १३६ बॉल्समध्ये केलेल्या नाबाद १०३ रन्समध्ये ५ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. तर अजिंक्य रहाणेनं १८ बॉल्समध्ये नाबाद २३ रन्स बनवल्या. तर काल अभिनव मुकुंदनं ८१ रन्सची खेळी केली. विराट कोहली आणि अभिनव मुकुंदनं तिस-या विकेटसाठी 133 रन्सची पार्टनरशिप केली.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा