मुंबई : २०१९ मध्ये खेळवल्या जाणा-या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेची टीम असणार की नाही, यावर चर्चा सुरू असतानाच श्रीलंकेला वर्ल्ड कपच्या अंतिम आठ टीम्समध्ये जागा मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडने वेस्ट इंडिजचा सात विकेट्सनी पराभव केल्यावर आपोआप श्रीलंका वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. नाहीतर वेस्ट इंडीजला ही संधी मिळाली असती. 


आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये ७८ गुणांवर असलेला वेस्ट इंडिज संघ श्रीलंकेच्या (८६ गुण) पुढे जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे श्रीलंकेने विश्वचषकामध्ये आपलं स्थान कायम केलं आहे. आता वर्ल्ड कपमध्ये खेळणा-या आठ देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. ३० मे ते १५ जुलै २०१९ या कालावधीत इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे.