संघात मोलाची कामगिरी करूनही वाट्याला निराशा, क्रिकेटपटून व्यक्त केल्या भावना
27 शतक ठोकले पण तरीही टीम इंडियात मिळाली नाही जागा
मुंबई: टीम इंडियाची सीनियर टीम म्हणजे A टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये शिखार धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देणात आली आहे. दुसरी म्हणजेच B टीम जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघामध्ये मराठमोळ्या पुण्याच्या ऋतुराजला संधी मिळाली. पण 27 शतक ठोकणारा एक क्रिकेटपटू मात्र या संधीपासून कोसो दूरच राहिला.
रणजी ट्रॉफी, आयपीएल सारख्या सामन्यांमध्ये आपली चांगली कामगिरी करूनही या खेळाडूच्या पदरात निराशा आली आहे. त्याने सोशल मीडियावर टीम इंडियाचा संघ जाहीर झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. शेल्डन जॅक्सननं ट्विटरवर ब्रोकन हार्ट इमोजी शेअर केला आहे. वेगवेगळ्या सामन्यांमध्ये 27 शतक ठोकणाऱ्या जॅक्सनच्या पदरात निराशा पडली असून टीम इंडियात त्याला संधी न मिळाल्यानं भावना व्यक्त केल्या आहेत.
रोहन गावस्करने त्याला निराश न होण्याचा ट्विटरवर सल्ला दिला आहे. दोन रणजी हंगामात जॅक्सननं 800 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने आपल्या नावावर फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि टी 20 तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 27 शतक केले आहेत. 76 फर्स्ट क्लास सामन्यात 19 शतक आणि 27 अर्धशतक ठोकले आहेत. त्याच्या नावावर 5 हजार 634 धावा आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका 13, 16 आणि 18 जुलै दरम्यान वन डे सामने होणार आहेत. तर 21, 23 आणि 25 जुलै दरम्यान टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. टी 20 सामने संध्याकाळी 7 वाजता तर वन डे सामने दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार आहेत. हे सामने संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू लगेच परतणार आहेत.
राहुल द्रविड टीम B चा कोच तर शिखर धवन नेतृत्व करणार आहे. भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सांभाळण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, पडिक्कल, आर गायकवाड, एस यादव, एम पांडे, हार्दिक पंड्या, नितीन राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, चहर, के गौथम, कृणाल पंड्या, के यादव, व्ही चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), डी चहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया यांची निवड करण्यात आली आहे.