मुंबई: क्रिकेटच्या पिचवर सामना सुरू असताना काही सेकंदासाठी जर तुम्हाला फुटबॉलचा सामना खेळताना पाहायला मिळाला तर आश्चर्याचा धक्काच बसेल. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सुरू असलेल्या सामन्यामध्ये चक्क ऑलराऊंडरनं फुटबॉल स्टाइलनं फलंदाजाला आऊट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा खेळाडू सॅम करन याने फुटबॉल स्टाइलनं श्रीलंकेच्या फलंदाजाला आऊट केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला उधाण आलं. श्रीलंकेचा फलंदाज दानुष्का गुणाथिलकाला आऊट करण्याची स्टाइल फारच जबरदस्त होती. सॅमच्या या स्टाइलनं सर्वजण हैराण झाले. 



इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सामना सुरू आहे. या दानुष्का गुणाथिलकाने बॉल टोलवला आणि एक रन घेण्यासाठी धावत सुटला. त्याच वेळी सॅन करनने धावत तोच बॉल स्टम्पच्या दिशेनं पायाने फुटबॉल सारखा टोलावला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.