कटक : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. टेस्ट सीरिज आणि वनडे सीरिज जिंकल्यानंतर आता भारतीय संघ टी-20 जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.


असा आहे भारतीय संघ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टी-20मध्ये भारतीय संघात के.एल.राहुल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि युझुवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा


आज होणाऱ्या पहिल्या टी-20नंतर २२ डिसेंबरला इंदोरमध्ये तर २४ डिसेंबरला मुंबईमध्ये तिसरी टी-20 होणार आहे. टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यानंतर आता टी-20 सीरिज खेळण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.


तर रोहित 'विराट' क्लबमध्ये पोहोचणार!


टी-20मध्ये १५०० रन्स पूर्ण करण्याची संधी या मॅचमध्ये भारताचा कॅप्टन रोहित शर्माला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये रोहितच्या नावावर १४८५ रन्स आहेत. त्यामुळे रोहित या रेकॉर्डपासून फक्त १५ रन्स दूर आहे.


आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर १९५६ रन्स आहेत. विराटनं ५५ मॅचमध्ये १३७.८४च्या स्ट्राईक रेटनं या रन्स केल्या आहेत. विराटच्या नावावर १८ अर्धशतकंही आहेत.


रोहित शर्मानं ६८ मॅचमध्ये १२९.९२च्या स्ट्राईक रेटनं १४८५ रन्स बनवल्या आहेत. यामध्ये १२ अर्धशतकं आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या भारतीयांमध्ये विराट पहिल्या क्रमांकावर तर रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे.