प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा श्रीकांत बनला चौथा भारतीय
जगात आठव्या क्रमाकांवर असलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबी ग्लासगोमध्ये सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.
नवी दिल्ली : जगात आठव्या क्रमाकांवर असलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबी ग्लासगोमध्ये सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.
प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा तो चौथा भारतीय बनला आहे. किदांबीने फ्रांसचा खेळाडू लुकास कोरवीला 21-9, 21-17 ने पराभवाची धूळ चारली. याआधी पी.व्ही सिंधु, सायना नेहवाल आणि साई प्रणीथ प्री क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचू शकले होते.