कोलंबो : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आलाय. आर. अश्विनच्या पाच विकेट, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शामीच्या प्रत्येकी दोन विकेटमुळे श्रीलंकेच्या संघाला केवळ १८३ धावांवर रोखता आले. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेने तिसऱ्या दिवसाची सुरुवात दोन बाद ५०वरुन झाली. मात्र भारताच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या संघाला केवळ १३३ धावांची भर घालता आली. 


दुसऱ्या दिवशी फलंदाजीमध्ये चमकलेले आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा गोलंदाजीतही चमकले. त्यांनी तिसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण विकेट मिळवताना श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. यापूर्वी दुसऱ्या दिवशी भारताने ९ बाद ६२२ वर डाव घोषित केला होता.