Sports News : आशिया कपच्या फायनल अगोदर सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. श्रीलंकेने टॉस जिंकत पाकिस्तानला बॅटींगसाठी आमंत्रित केलं होतं, मात्र पाकिस्तानचा संघ श्रीलंकेसमोर अवघ्या 121 धावात ऑल आऊट झाला. यामध्ये बाबर आझम 30 आणि मोहम्मद नवाझ यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या. (Asia Cup Pak vs SL)
 
श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर श्रीलंका फलंदाजीला आल्यावर पाकिस्तानने सुरूवातीलाच कुशल मेंडिस 0, गुणतलिका 0 आणि धनंजय डिसिल्वा 9 धावांवर बाद झाले. दुसरीकडे सलामीवीर निसांकाने एक बाजू लावून धरली होती. निसांकाने नाबाद 55 धावांची खेळी केली.  हसरंगाने तीन चेंडूंमध्ये 10 धावा करत शेवटच्या बॉलवर चौकार मारत विजयावर शिक्कमोर्तब केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. मात्र श्रीलंकेला पाकिस्तानने हलक्यात घेण्याची चूक करू नये, नाहीतर आजच्या सामन्यासारखा फायनलचाही निकाल लागू शकतो. आशिया कपचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचाही श्रीलंकेने पराभव केला होता. 


दरम्यान, पाकिस्तान संघावर आजच्या पराभवामुळे काही प्रमाणात दडपण राहण्याची शक्यता आहे. आशिया चषक 2022चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) खेळवला जाणार आहे. (Asia Cup Final 2022)