...आणि संतापलेल्या वावरिंकाने टेनिस रॅकेट तोडली
फ्रेंच ओपन स्पर्धेतील फायनलमध्ये स्पेनच्या राफेल नदालने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाला नमवत जेतेपदाची दशकपूर्ती साजरी केली.
पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेतील फायनलमध्ये स्पेनच्या राफेल नदालने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाला नमवत जेतेपदाची दशकपूर्ती साजरी केली.
तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पूर्णपणे नदालचे वर्चस्व होते. नदालने वावरिंकावर ६-२,६-३, ६-१ असा दमदार विजय मिळवला.
पहिल्या सेटपासूनच नदालने वावरिकांवर वर्चस्व मिळवले होते. दुसऱ्या सेटमध्ये वावरिंकाने नदालला थोडीशी झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र नदालने हे प्रयत्नही फोल पाडले.
दुसऱ्या सेटदरम्यान आपल्याकडून होत असलेल्या चुकांनी वावरिंका चांगलाच संतापला. यावेळी संतापलेल्या वावरिकांने टेनिस रॅकेट जोरात जमिनीवर आपटली आणि तोडून टाकली.