Sania Mirza Announces Retirement: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza)  निवृत्तीची घोषणा केली आहे. एक सोशल मीडिया पोस्ट करत सानियाने प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर ती टेनिसच्या कोर्टवर दिसणार नाही. तिच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. (Star tennis player Sania Mirza announced her retirement Australian Open will be her last tournament marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत तिने निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर आपल्या मुलासोबत अधिक वेळ घालवणार असल्याचं सानिया मिर्झाने सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सानिया टेनिसला अलविदा करणार, अशी चर्चा सुरू होती. त्याबाबत तिने याआधी देखील संकेत दिले होते. त्यानंतर आज तिचा निर्णायक दिवस राहिला आहे.


काय म्हणाली Sania Mirza ?


30 वर्षांपूर्वी... होय, 30 वर्षांपूर्वी हैदराबादच्या शाळेतली एक सहा वर्षांची मुलगी आईसोबत निजाम क्लबच्या टेनिस कोर्टमध्ये गेली होती. टेनिसचे धडे देण्यासाठी ती प्रशिक्षकांसोबतही लढली. प्रशिक्षकांना ती लहान असल्याचं वाटलं. पण माझ्या स्वप्नांसाठी लढाई वयाच्या सहाव्या वर्षीच सुरू झाली होती, असं सानिया यावेळी म्हणाली आहे.



सानिया मिर्झाचं करियर 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमधून सुरू झालं होतं. त्यामुळे 'माझ्या करिअरचा शेवट करण्यासाठी हेच योग्य ग्रँड स्लॅम असेल', असं सानिया म्हणाली आहे. 18 वर्षांनी अखेरची ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी तयार आहे, असंही सानिया यावेळी म्हणाली. माझ्या मनात अभिमान आणि कृतज्ञता आहे, अशा भावना देखील तिने यावेळी व्यक्त केल्या आहेत.


आणखी वाचा - 'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral


दरम्यान, आठवण, अभिमान आणि आनंद या तिन्ही गोष्टी मी माझ्या देशवासियांच्या आणि समर्थकांच्या चेहऱ्यावर पहायला मिळला. त्यामुळे मी यशावर पोहोचू शकले, असंही सानिया म्हणते. या पोस्टमधून तिने चाहत्यांचे, देशवासियांचे आणि सहकाऱ्याचे आभार देखील मानले आहेत. मागील वेळी दुखापतीमुळे सानियाला अमेरिकन ओपनमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर आता सानिया ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कमाल करेल, अशी अपेक्षा सर्वांना आहे.