मुंबई : हार्दिक पांड्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया, वाद-विवाद यांचा सामना केला आहे. या सर्व गोष्टी मागे टाकून त्याने इंडियन प्रीमियर लीगमधील गुजरात टायटन्सचं कर्णधारपद स्विकारलं आणि स्वतःला सिद्ध करत त्याने टीमला अंतिम फेरीत नेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सने पराभव केल्यानंतर हार्दिक म्हणतो, "लोक याबद्दल बोलतील, हे त्यांचे काम आहे. मी काही करू शकत नाही.'


तो पुढे म्हणाला, 'हार्दिक पांड्याचं नाव नेहमीच विकलं जातं आणि मला त्याची कोणतीही अडचण नाही. मी हसतमुखाने त्याचा सामना करतो. 


मुंबई इंडियन्स सोबतच्या यशानंतर 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पांड्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यावेळी त्याची तुलना वर्ल्डकप विजेता कर्णधार कपिल देव यांच्याशी करण्यात आली होती. 2019 मध्ये 'कॉफी विथ करण'मध्ये महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल तिला निलंबित करण्यात आलं होतं.


हार्दिकच्या म्हणण्याप्रमाणे, तो म्हणाला, "माही भाईने माझ्या आयुष्यात मोठी भूमिका बजावलीये. तो माझ्यासाठी भाऊ, मित्र आणि कुटुंबासारखा आहे. त्याच्याकडून मला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या."