मुंबई : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्याच्यावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.


स्मिथने घेतला मोठा निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आस्ट्रेलियाद्वारे लावण्यात आलेल्या १२ महन्यांच्या बंदीविरोधात स्मिथ अपील नाही करणार आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टअनुसार, स्मिथने बुधवारी एक ट्विट करत याची माहिती दिली. स्मिथने ट्विट केलं की, 'मी ही घटना विसरण्यासाठी आणि आपल्या देशाचं क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी जे म्हटलं त्या गोष्टीचं मी मला मुल्य आहे आणि मी कर्णधार म्हणून झालेल्या घटनेची जबाबदारी घ्यायला तयार आहे. माझ्यावर लावण्यात आलेली बंदी ही एक कडक संदेश देण्यासाठी आहे आणि मी त्याचा सन्मान करतो.'


वर्ल्डकपमध्ये करणार वापसी


स्मिथ आता एप्रिल २०१९ नंतरच क्रिकेटमध्ये वापसी करु शकतो. एप्रिलनंतरच इंग्लंडमध्ये वर्ल्डकप होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्यात स्मिथ, उप-कर्णधार डेविड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टला दोषी पकडण्यात आलं आहे. पण डेविड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट या निर्णयाविरोधात याचिका करतात का हे पाहावं लागेल.