ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला राजीनामा
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातील टेस्ट सिरीजमधील सर्वात मोठी बातमी.
मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातील टेस्ट सिरीजमधील सर्वात मोठी बातमी.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमरन बॅनक्राफ्ट चेंडूसोबत छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावरून मोठा वादळ निर्माण झाल्यावर स्टीव्ह स्मिथ आणि बॅनक्राफ्टने आपली चूक मान्य केली आहे. आता ऑस्ट्रेलिया संघाचे कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि उपकॅप्टन डेव्हिड वॉर्नरने तिसऱ्या टेस्टमध्ये आपल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी सांगितले की, आम्ही स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरशी या प्रकरणासंदर्भात चर्चा केली. दोघांनी या प्रकरणानंतर या टेस्ट सामन्याकरता आपले पद सोडण्यास तयार झाले. हा राजीनामा फक्त तिसऱ्या मॅच करता आहे. हा सामना सुरू असल्यामुळे हे दोघेही संघाचा भाग असतील. मात्र कॅप्टनपद टिम पेनला दिली आहे.
सदरलँड म्हणाले की, आम्ही अगोदरच सांगितलं होतं की, या प्रकरणाची आम्ही पूर्ण चौकशी करू. आमचे चाहते आणि जनता आमच्याकडून जी अपेक्षा करत आहे त्याला आम्ही न्याय देऊ. बॉल टेंपिरिंगच्या मुद्यावरून स्टीव्ह स्मिथने रविवारी आपल्या सेंकड सेशनमध्ये टीमसोबत दिसला नाही.