IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 4 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा टेस्ट सामना 17 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी खेळवला जाणार आहे. पहिली टेस्ट मॅच गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र नागपूर टेस्टमध्ये मिळालेल्या पराभव कांगारू अजूनही विसरले नाहीत. याचच कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी (Australia Team) सामन्यापूर्वी दिल्लीचं पीचचा अगदी जवळून अभ्यास केला आहे. 


स्मिथने दिल्ली पीचची जवळून केली पाहणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाची टीम बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आली आहे. टेस्टमध्ये नंबर 1 असणाऱ्या ऑस्ट्रेलिया टीमला भारताने मात्र पराभूत केलं. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभावाचं खापर ऑस्ट्रेलियाने खराब पीचवर फोडलं होतं. मुख्य म्हणजे भारतात येण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाची टीम पीचबाबत प्रश्न उपस्थित करत होती. मात्र दुसरा टेस्ट सामना सुरु होण्यापूर्वीच स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) पीचची पाहणी केली आहे. 


सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टिव्ह स्मिथचा फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो दिल्लीच्या स्टेडियमच्या क्रिकेट ग्राऊंडचं पीच अगदी जवळून पाहताना दिसतोय. या फोटोवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, कांगारू खेळाडूंच्या मनात टीम इंडियाच्या स्पिनरबाबत भीती निर्माण झाली आहे. 



Rohit Sharma नेही दिलं होतं विधान


बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ज्यावेळी भारतात आयोजित करण्याचं म्हटलं होतं तेव्हापासून ऑस्ट्रेलियाकडून भारतीय पीचवर अनेक आरोप केले जातात. खासकरून नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात पीचबाबत अशाच प्रकारे अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले होते. कांगारूंचा असा विश्वास होता की, भारताकडून खेळपट्टीशी छेडछाड केली जातेय. दरम्यान आता पहिला सामना संपल्यावर रोहित शर्मानेही या प्रकरणावर आपले मौन सोडलंय.


पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, सर्वात वाईट बाब ही आहे, ते म्हणजे, खेळाडूंच्या कौशल्य आणि क्षमतेपेक्षा पीचबद्दल अधिक बोललं जातंय. 


WTC चा फायनल सामना 7 ते 11 जून असा खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीम असण्याची शक्यता वर्तवली जातेय. टीम इंडियाने नागपूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमला एक डाव आणि 132 रन्सने मात दिली होती. 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये दुसरी टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया अभेद्य आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाला ही सिरीज जिंकणं गरजेचं आहे.