Steve Smith Video : स्मिथचं वादळ काही थांबेना, पठ्ठ्याने 1 बॉलमध्ये काढल्या16 धावा
दोन शतके झळकावल्यानंतरही चौकार षटकारांची आतषबाजी सुरू आहे. अशातच स्मिथने आणखी एक कारनामा केलाय, 1 बॉलमध्ये स्मिथने तब्बल 16 धावा कुटल्या आहेत.
BBL Steve Smith 1 Ball 16 Run Video : बीबीएलमध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेल्या स्टीव्ह स्मिथ काही थांबताना दिसत नाहीये. दोन शतके झळकावल्यानंतरही चौकार षटकारांची आतषबाजी सुरू आहे. अशातच स्मिथने आणखी एक कारनामा केलाय, 1 बॉलमध्ये स्मिथने तब्बल 16 धावा कुटल्या आहेत. सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील मॅचमध्ये दुसऱ्याच ओव्हरमध्ये स्मिथने त्याचा दांडपट्टा चालवायला सुरू केली. (Steve Smith scores 16 runs in one ball in Sydney Sixers vs Hobart Hurricanes match in Big Bash League Watch Video)
नेमकं काय झालं?
जोएल पॅरिस संघाचं दुसर आणि स्वत:चं पहिलं षटक टाकण्यासाठी आला. यातील पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. त्यानंतर तिसरा 16 धावा देणारा चेंडू टाकला. तिसऱ्या चेंडूवर स्मिथने स्क्वेअर लेगकडे षटकार ओढला तो नो- बॉल होता. नो बॉलमुळे स्मिथला फ्री हिट मिळाली होती मात्र तो चेंडूही वाईड टाकला अन कीपरलाही अडवता आला नाही आण चौकार गेला. पुन्हा एकदा स्मिथला फ्री हिट मिळाली त्यावर त्याने चौकार मारला. अशा प्रकारे दुसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर स्मिथने 16 धावा वसुल केल्या.
स्मिथने या खेळीमध्ये अवघ्या 22 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवलं. 33 चेंडूंमध्ये 66 धावा करत मोलाचा वाटा उचलला. नॅथन एलिसच्या फुल टॉस चेंडूवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. स्टीव्ह स्मिथने आपल्या खेळीमध्ये 4 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार ठोकले. स्मिथने यंदाच्या बिग बॅशच्या सीझनमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज बनला आहे.
दरम्यान, याआधी स्मिथने दोन शतके केली असून यामधील अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 56 चेंडूत 101 धावा तर सिडनी थंडर्सविरुद्ध दुसरे शतक केलं होतं. यामध्ये 66 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 125 धावा काढल्या होत्या.