मुंबई : बॉल टॅपरिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी लावण्यात आली आहे. आता पुढील एक वर्ष स्टीव्ह स्मिथ क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही.  एका वर्षाकरता स्टीव्ह स्मिथला बॅन केल्यावर पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथ ढसाढसा रडला. आणि त्याने बॉल टॅपरिंग प्रकरणाबाबत त्याने संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या जनतेची माफी मागितली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सोशल मीडियावर स्टीव्ह स्मिथच्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्टीव्ह स्मिथच्या वडिलांनी पत्रकार परिषेदत ओक्साबोक्शी रडणाऱ्या स्टीव्ह स्मिथला आधार देणाऱ्या वडिलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्टीव्ह स्मिथच्या वडिलांनी आपल्या मुलाची क्रिकेट किट बॅग पॅक करून गॅरेजमध्ये ठेवून दिली आहे. 



स्टीव्ह स्मिथला पुढील एकवर्ष या किट बॅगची गरज लागणार नाही. त्यामुळे आता या किटला पॅक करून गॅरेजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. असं पीटर स्मिथ यांनी सांगितलं. स्टीव्ह स्मिथचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं असलं तरी त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आणखी एक झटका दिला आहे. दोन वर्षांपर्यंत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकणार नाही. त्यामुळे २०१९च्या वर्ल्ड कपसाठी स्मिथची टीममध्ये निवड झाली तरी त्याला कर्णधार होता येणार नाही.


तर डेव्हिड वॉर्नरला यापुढे कधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता येणार नाही, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे २०१९ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.