नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार स्टीवन स्मिथने गुरूवारी इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल)मध्ये राजस्थान रॉयल्ससोबत आगामी २०१८ सीझनसाठी वापसी केल्याने आनंद व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंबर १ टेस्ट खेळाडू स्मिथ एकुलता एक खेळाडू आहे ज्याला राजस्थानने रिटेन केलं आहे. राजस्थान रॉयल्स दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये वापसी करत आहे. 


स्मिथ आनंदी


स्मिथ म्हणाला की, ‘आयपीएलच्या या सीझनमध्ये मी राजस्थानच्या सोबत असल्याने खूप आनंदी आहे. ही एक चांगली फ्रॅन्चायजी आहे. मी याआधी त्यांच्यासोबत खेळलो आहे आणि एकदा पुन्हा खेळण्यास तयार आहे’.


सुरेश रैना रिटेन


राजस्थानसोबतच चेन्नई सुपरकिंग्सने सुद्धा आयपीएलमध्ये वापसी केली आहे. चेन्नईने महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांना रिटेन केलं आहे. रैना म्हणाला की, ‘दोन वर्षांनंतर चेन्नईने वापसी केल्याने चांगलं वाटत आहे. एकदा पुन्हा दर्शकांसमोर खेळण्यासाठी मी तयार आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी त्यांना खूप मिस केलं’.


इतकी लागली स्मिथची किंमत


आतापर्यंत रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात महागडा खेळाडूं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ठरला. त्याला त्याच्या जुन्या चॅलेंजर्स बंगळुरू टीमने १७ कोटींमध्ये रिटेन केलं आहे. तेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ १२ कोटींमध्ये रिटेन झाला आहे.