Stuart Broad : सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड यांच्यात अॅशेज सिरीज ( Ashes series 2023  ) सुरु आहे. या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सिरीजमधील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून तिसरा सामना मात्र इंग्लडने आपल्या खिशात घातला. यावेळी इंग्लंडच्या विजयात ख्रिस वोक्सने ( Chris Woakes ) मोलाची भूमिका निभावली. वोक्सने आपल्या खेळीद्वारे चाहत्यांसोबत साथीदार खेळाडूंच्या पत्नीवरही भूरळ घातल्याचं दिसून आलं आहे. इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची ( Stuart Broad ) पत्नी ख्रिस वोक्सला अधिक पसंत करत असल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ( Stuart Broad ) त्याचा साथीदार ख्रिस वोक्सबाबत ( Chris Woakes ) मोठा खुलासा केला आहे. ब्रॉडच्या म्हणण्याप्रमाणे, माझी पत्नी मॉली किंग ब्रॉड  माझ्यापेक्षा जास्त ख्रिस वोक्सला ( Chris Woakes ) अधिक पसंत करते. 


स्टुअर्ट ब्रॉडने ( Stuart Broad ) खुलासा केलाय की, पत्नी मॉलीच्या आवडत्या क्रिकेटरच्या बाबतीत तो स्वतः दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे ख्रिस वोक्स ( Chris Woakes ) त्याच्या पत्नीचा आवडता क्रिकेटर आहे. हेडिंग्लेमध्ये त्याच्या मॅच-विनिंग इनिंगनंतर, मॉली वोक्सला अधिकत पसंत करू लागली आहे. 


डेली मेलसाठीच्या लिहिलेल्या एका कॉलमसाठी ब्रॉडने ( Stuart Broad ) लिहितो, "ख्रिस वोक्स ( Chris Woakes ) एक अद्भुत क्रिकेटर आहे. मॉलीने मला सांगितलंय की, तो तिचा सर्वात आवडता खेळाडू आहे. यावर माझं उत्तर होतं की, ज्याला मी उत्तर दिले, 'माझ्याबदद्ल काय वाटतं तुला?' यावर ती म्हणाली 'तू दुसरा आगेय' '


हेडिंग्ले टेस्ट सामन्याच्या विजयात वोक्सचा ( Chris Woakes ) आणखी एक महत्त्वाचा वाटा होता. यावेळी त्याने पहिल्या डावात पाच विकेटसह एकूण सामन्यात सात बळी घेतले. याशिवाय त्याने फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. याशिवाय ब्रॉडबद्दल 600 टेस्ट विकेट्सच्या जवळ आहे. वोक्सविषयी बोलताना ब्रॉड ( Stuart Broad ) म्हणाला की, त्याने दोन वर्ल्डकप फायनल जिंकण्यात मदत केलीये. परंतु त्याचे सर्वात महत्त्वाचे अष्टपैलू योगदान हेडिंग्लेटेस्ट सिरीजमध्ये दिसलं.