Sports : सामन्यादरम्यान खेळाडू अचानक बसला आणि काही सेकंदात मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा
सामन्यादरम्यान खेळताना 26 वर्षीय खेळाडूचा (Player) अचानक मृत्यू (Death) झाला आहे.
मुंबई : क्रीडाविश्वातून (Sports) मोठी बातमी समोर आली आहे. सामन्यादरम्यान खेळताना 26 वर्षीय खेळाडूचा (Player) अचानक मृत्यू (Death) झाला आहे. खेळाडूच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार होती. त्यानंतर तो खाली बसला. मित्रांनी त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस सध्या तरुणाच्या पोस्टमार्टम रिपोर्टची (Postmartam) वाट पाहत आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्यांचा मृत्यू झाल्याचे समजतंय. ही घटना मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये घडलीय. अभिषेक असं मृत तरुणाचं नाव आहे. (sudden death of young man during playing basketball at bhopal madhya pradesh)
अभिषेक भोपाळमधील हबीबगंज भागातील एका खासगी शाळेत बास्केटबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना अभिषेकने छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. यानंतर तो मित्रांजवळ जाऊन बसला. जेव्हा त्याचा त्रास असह्य झाला तेव्हा अभिषेकला त्याच्या मित्रांनी जवळच्या रुग्णालयात नेलं.
येथून अभिषेकला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं, मात्र तोवर उशीर झाला होता. अभिषेकने जगाचा निरोप घेतला होता. यानंतर शवविच्छेदनानंतर अभिषेकचा मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला.
सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. जेणेकरून अभिषेकच्या मृत्यूचे कारण कळू शकेल. अभिषेक अविवाहित असून तो एमपी नगर येथील एका फायनान्स कंपनीत कामाला होता.
अभिषेकचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. तर आई खासगी शाळेत काम करते. "अभिषेक सुरुवातीपासूनच क्रीडा क्षेत्रात सक्रिय होता. यापूर्वी त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. तो नियमित व्यायामही करायचा", अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. दरम्यान अवघ्या 26 व्या वर्षी अभिषेकचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.