Ind vs Eng: अचानक इंग्लंडचे खेळाडू पडले आजारी; तिसऱ्या टेस्टपूर्वीच खेळाडू भारत सोडून बाहेर
India vs England Test Series: काही मिडीया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, इंग्लंडची टीम भारत देश सोडून निघून गेली आहे. ते सध्या अबूधाबीमध्ये सिरीजची तयारी करण्यात व्यस्त आहे.
India vs England Test Series: भारत विरूद्ध इंग्लंड ( India vs England Test Series ) यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. सध्या या सिरीजमधील 2 सामने खेळले गेले असून सिरीज 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा 106 रन्सने विजय झाला आहे. दरम्यान 2 टेस्ट सामने झाल्यानंतर एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, इंग्लंडचे ( England ) अनेक खेळाडू एकत्र आजारी पडले आहेत.
दुसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ( Ben Stokes ) एक धक्कादायक बातमी दिली आहे. बेन स्टोक्सने ( Ben Stokes ) खुलासा केला आहे की, टीममधील अनेक सदस्य आजारी पडले आहेत. काही खेळाडू आजारी असून ते दुसऱ्या टेस्टमध्ये चौथ्या दिवशी मैदानात उतरले होते.
इंग्लंडच्या टीम देशातून बाहेर?
काही मिडीया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, इंग्लंडची टीम भारत देश सोडून निघून गेली आहे. ते सध्या अबूधाबीमध्ये सिरीजची तयारी करण्यात व्यस्त आहे. मात्र तिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी इंग्लंडची टीम भारतात येणार आहे.
भारत विरूद्ध इंग्लंड ( India vs England Test Series ) यांच्यातील पुढचा टेस्ट सामना 15 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. अशातच तिसरी टेस्ट खेळण्यासाठी 10 दिवसाची वेळ आहे. त्यामुळे इंग्लंडच्या टीमला पुन्हा भारतात येण्यासाठी पुरेसा वेळ आहे.
काय म्हणाला बेन स्टोक्स?
106 रन्सने दुसरा टेस्ट सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ( Ben Stokes ) मीडियाशी संवाद साधला. यादरम्यान बेन स्टोक्सने सांगितलं की, टीममधील काही खेळाडू आजारी आहेत. सोमवारी फलंदाजी करणारे बेन फॉक्स, ऑली पोप आणि टॉम हार्टली पूर्णपणे फीट नव्हते. सोमवारी सकाळी उठल्यानंतर काही खेळाडूंना बरं वाटत नव्हते. आमच्या खेळाडूंना व्हायरसची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता इंग्लंडची टीम अबुधाबीला रवाना झाली आहे. त्या ठिकाणी तिसऱ्या टेस्टसाठी तयारी करण्यात येणार आहे. यानंतर इंग्लंडची टीम 12 किंवा 13 फेब्रुवारीपर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे. इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यात अजून 3 टेस्ट सामने खेळायचे बाकी आहेत.