Rohit Sharma: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अखेर टीम इंडियान न्यूझीलंडचा पराभव करत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडटा 70 रन्सने पराभव केला. 398 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची टीम 327 रन्सवर गारद झाली. दरम्यान या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूश दिसून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयानंतर रोहित शर्माने फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही विजयाचं श्रेय दिलंय. रोहित म्हणाला की, या विकेटवर तुम्ही कितीही रन्स केले तरी ते खूप कमी असतील. मी इथे खूप क्रिकेट खेळलो आहे. तुम्ही कितीही रन्स केले तरी तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. मला माहिती होतं की, आमच्यावर दबाव आहे, पण आमची टीम खूप चांगली आहे आणि आम्ही शेवटी सामना जिंकू शकलो."


न्यूझीलंडच्या टीमविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, न्यूझीलंडने त्यांच्या डावात फारशी रिस्क घेतली नाही. पण आम्ही विकेट्स घेतल्या असतील किंवा नसतील आम्ही पण धोका पत्करून विकेट घेतल्या. आम्हाला फक्त शांत राहायचे होतं, क्राऊड शांत झाला होता. पण आम्ही कमबॅक केलं. आमचे सहाही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अय्यरने या स्पर्धेत आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे.


शुभमन गिलचं रोहित शर्माकडून कौतुक


"गिलला क्रॅम्प्स येत होते. आज विराट कोहलीनेही खूप चांगली कामगिरी केली. आमच्या गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती, पण ही सेमीफायनलची मॅच होती, त्यामुळे मी असे म्हणणार नाही, कोणताही दबाव नव्हता, हो दबाव होता, पण टीमच्या खेळाडूंनी त्यांचं काम चोख बजावलं."


टीम इंडियाचा 70 रन्सने विजय


टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर सेमी फायनलमध्ये विजयासाठी 398 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 397 रन्स केले. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. विराटने 117 आणि श्रेयसने 105 धावांची खेळी केली. तर शुभमन गिल याने 80 धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 397 रन्स करता येणं शक्य झालं.


लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यावेळी डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र या दोन्ही ओपनर्सने शमीने तंबूत पाठवलं. त्यानंतर मात्र, पारडं पालटलं. कॅप्टन केन आणि डॅरिल मिशेल यांनी संयमी खेळी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून रोहितने शमीला गोलंदाजी दिली आणि त्याने देखील कॅप्टनला निराश केलं नाही. अखेरीस 70 रन्सने टीम इंडियाचा विजय झाला.