Shikhar Dhawan: मंगळवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात हैदराबादने 2 रन्सने पंजाबचा पराभव केला. या पंजाबच्या यंदाच्या सिझनमधील तिसरा पराभव होता. पराभवानंतर, सामनानंतरच्या मुलाखतीचा भाग असलेल्या शिखर धवनने सामन्यात झालेल्या चुकांबद्दल सांगितलं. या सामन्यात शानदार खेळी करणाऱ्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांचं त्यांनी कौतुक केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचा पाचवा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला. या पराभवानंतर, सामनानंतरच्या मुलाखतीचा भाग असलेल्या शिखर धवनने त्याच्या चुकांबद्दल सांगितले. या सामन्यात शानदार खेळी करणाऱ्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांचे त्यांनी कौतुक केलं. 


कॅच ड्रॉप करणं भारी पडलं- धवन


हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर शिखर धवन म्हणाला, “मला वाटतं शशांक आणि आशुतोष यांनी शानदार खेळी खेळली, आम्ही त्यांना चांगल्या धावसंख्येपर्यंत रोखलं. पण पहिल्या 6 ओव्हरचा फायदा आम्हाला घेता आला नाही. 3 विकेट्स गमावल्या आणि इथेच आम्ही मागे पडलो. यावेळी शेवटी आम्हाला परिणाम भोगावे लागले. आम्ही कॅच सोडले. त्यांना 10-15 धावांपर्यंत रोखू शकलो असतो, पण फलंदाजी चांगली झाली नाही. आगामी सामन्यामध्ये आम्हाला आणखी चांगली कामगिरी करायची आहे.”


पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (Punjab Kings vs Sunrisers Hyderabad) यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात हैदराबादने पंजाबचा केवळ 2 धावांनी पराभव केला. शेवटच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने शशांक सिंग (Shashank Singh) आणि आशुतोष शर्मासमोर (Ashutosh Sharma) 29 धावा डिफेन्ड केल्या अन् पारडं हैदराबादच्या बाजूने झुकलं. 183 धावांचा पाठलाग करताना पंजाबला सुरूवातीला धक्के बसले पण पुन्हा एकदा 'नकोसा' शशांक सिंग पंजाबसाठी धावून आला. अशितोष शर्माने त्याला साथ दिल्याने पंजाबचा संघ सामन्यात परत आला. मात्र, शशांकच्या 46 धावांच्या खेळीनंतर देखील पंजाबला सामना गमवावा लागला. हैदराबादकडून भूवीने 2 विकेट्स काढले. 


प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशाचा युवा खेळाडू नीतीश कुमार रेड्डी (Nitish Reddy) याने हैदराबादसाठी 37 बॉलमध्ये 64 धावांची खेळी केली. तर अब्दुल समदने 12 बॉलमध्ये 25 रन्स केले. शाहबाझ अहमदने 7 बॉलमध्ये 14 धावांची फिनिशिंग दिली. त्यामुळे हैदराबादला 182 धावा उभ्या करता आल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने 4 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या.