Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉल टीमचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सुनील छेत्रीने कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 39 वर्षीय छेत्रीने त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 145 सामने खेळले आहेत. यावेळी छेत्रीने 93 गोल केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील छेत्रीने गुरुवारी त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा वर्ल्डकप 2026 पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. छेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ पोस्ट केलीये. यावेळी त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून निवृत्त होणार असल्याचं सांगितलंय. संदेशाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. सुनील छेत्रीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.



9 मिनिटांचा व्हिडीओ केला पोस्ट


सुनीलने सुमारे 9 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये निवृत्तीच्या निर्णयाबद्दल सांगितलंय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सुनीलने लिहिले की, मला तुम्हाला काही सांगायचंय. छेत्री त्याच्या निवृत्तीच्या व्हिडिओमध्ये भावूक झालेला दिसतोय. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या डेब्यू सामन्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहेय. यावेळी त्याला सुखी सरांची आठवण झाली, जे त्यांचे पहिले राष्ट्रीय टीमचे प्रशिक्षक होते. 


छेत्रीने सांगितले की, मी माझा पहिला सामना खेळलो तो मला अजूनही आठवतोय. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. मुळात मला कधीच वाटलं नव्हतं की, मी भारतासाठी इतके सामने खेळू शकेन. मी या निर्णयाबाबत पहिल्यांदा माझ्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. यावेळी माझी बायको मात्र रडू लागली. वडिलांना या निर्णयाचा आनंद झाला. 


मी आईला म्हणालो की, तू मला नेहमी म्हणत होतीस की, मला खेळताना पाहून तुला खूप दडपण येतं. पण आता तसं होणार नाही. मी भारतासाठी पुन्हा खेळणार नाही मग तू का रडतेय, असंही छेत्रीने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.