कारकीर्द लवकरच संपणार आहे पण....निवृत्तीवर सुनील छेत्रीचं वक्तव्य!
राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला त्याच्या निवृत्तीबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जातात.
नवी दिल्ली : भारताचा महान फुटबॉलपटू आणि राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला त्याच्या निवृत्तीबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जातात. गुरुवारी त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलताना, 37 वर्षीय छेत्रीने सांगितलं की, हे लवकरच संपणार आहे, असं विधान केलं आहे. सुनील छेत्रीच्या या विधानामुळे आता विविध चर्चा सुरु झाल्यात.
दरम्यान छेत्रीने त्याच वेळी हे देखील स्पष्ट केलं की तो पुढील काही वर्षे कुठेही जाणार नाहीये. मालेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या 79 वर पर्यंत पोहोचलीये.
छेत्री म्हणाला, "खरं हे आहे की ते (त्याची कारकीर्द) लवकरच संपणार आहे आणि मी त्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतोय. माझ्याकडे आता एक अतिशय सोपा मंत्र आहे. उभेखूप कमी वेळ शिल्लक आहे. शांतपणे जा आणि तुमचा बेस्ट द्या. (सर्व काही) थोड्याच वेळात संपणार आहे."
तो पुढे म्हणाला, अश्रू गाळत बसू नका, आनंद साजरा करा, निराश होणं थांबवा कारण हे सर्व लवकरच संपेल. सध्या मी मैदानावर जाऊन माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन कारण मला माहित आहे की ते लवकरच संपणार आहे. मात्र पुढील काही वर्षांमध्ये असं होणार नाही.
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीच्यानंतर सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये गोलच्या बाबतीत छेत्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो म्हणाला की, स्वत:ला बाहेरील गोष्टींपासून दूर ठेवणं पसंत करतो. कारण आता त्याच्या कारकिर्दीत काही थोडेच सामने शिल्लक आहेत. छेत्रीने 2005 मध्ये क्वेटामध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं. त्याने आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत भारतासाठी 124 सामने खेळले आहेत.