मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. सध्या तिसरा कसोटी सामना सुरू आहे. याआधी दक्षिण आफ्रिका आणि भारत दोन्ही संघांनी 3 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली आहे. आता तिसरा सामना कोण जिंकतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. याच दरम्यान चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य रहाणेकडे ही संधी होती पुन्हा कमबॅक करण्याची मात्र ती संधीच घालवली आहे. आता या दोघांचं कसोटीमधील करियर संपणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे सुनील गावस्कर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आता रिप्लेसमेंटच्या चर्चांना उधाण आलं आहे. 


चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही फलंदाजांना गेल्या काही महिन्यांपासून फ्लॉप होत आहेत. असं असतानाही त्यांना वारंवार संधी मिळत असली तरी या दोघंही त्यांचं सोनं करू शकले नाहीत. 


केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा टीम इंडियाचा भ्रमन निरास केला.पुजारा अवघ्या 9 धावा करून बाद झाला. 


या खराब कामगिरीमुळे पुजाराची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. अजिंक्य रहाणे केपटाऊनमध्ये 9 आणि 1 धावा करून बाद झाला.  सातत्याने खराब फॉर्ममुळे आता रहाणेची कारकीर्द धोक्यात आली आहे. 


गावस्करांचं मोठं विधान
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सतत खराब फॉर्ममध्ये खेळत आहेत. त्यामुळे पुढच्या सीरिज दरम्यान या दोघांबद्दल विचार केला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे त्यांच्याऐवजी श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. 


25 फेब्रुवारी रोजी श्रीलंके विरुद्ध 2 सामन्याची कसोटी सीरिज खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सीरिजसाठी पुजारा आणि रहाणेला संघातून कदाचित आऊट केलं जाण्याची शक्यता आहे.