Sunil Gavaskar On MS Dhoni: चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात चेन्नईने दणक्यात विजय नोंदवला. सामना जिंकल्यानंतर धोनी अँड ब्रिगेडने मैदानाचा एक राऊंड फेरी मारत प्रेक्षकांचं अभिवादन केलं. यावेळी समालोचन करत असलेल्या सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी धोनीच्या दिशेने धाव घेतली आणि त्याची ऑटोग्राफ (MS Dhoni Autograph) घेतली. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला होता. गावस्कर यांच्या या कृतीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.


काय म्हणाले सुनील गावस्कर ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीवर कोण प्रेम करत नाही? महेंद्रसिंह धोनीने गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटसाठी जे काही केलंय ते अफलातून आणि आश्चर्यकारक आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेणारे अनेक तरुण भारतात आहेत, त्याने स्वतःला आणि संघाला ज्यापद्धतीने हाताळलंय ते नक्कीच अप्रतिम आहे. मला जेव्हा कळालं चेन्नईचा संघ राऊंड मारणार आहे. मी पेन उधार घेतला आणि त्याला माझ्या जवळ ठेवला, असं सुनील गावस्कर (Sunil Gavaskar On MS Dhoni) म्हणतात दिसत आहेत.


आणखी वाचा - रोहित, विराट घेणार टी-ट्वेंटीमधून निवृत्ती? Ravi Shastri यांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले...


जर मला माझ्या आयुष्यातील शेवटच्या काही क्षणांमध्ये कोणत्याही दोन गोष्टी पहायच्या असतील, तर मला पहिली गोष्ट पहायची आहे ती म्हणजे कपिल देव यांचा 1983 चा वर्ल्ड कप (World Cup 1883) उचलण्याचा क्षण अन् दुसरं म्हणजे, षटकार मारल्यानंतर धोनीची होणारी बॅट स्विंग... जर हे दोघे माझ्या शेवटच्या क्षणी दिसले तर मी हसत हसत निघून जाईन, असं भावनिक वक्तव्य सुनील गावस्कर यांनी केलं आहे.



आयपीएलमध्ये कोणत्या संघात सामील होण्याची संधी मिळाली, तर मी चेन्नईच्या संघात सहभागी होऊ इच्छितो. धोनी ड्रेसिंग रूममध्ये रागावतो की शांत राहतो हे पाहायचे आहे, असं गावस्कर म्हणाले होते. सुनील गावस्कर आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. एकेकाळी ज्यांची संपूर्ण क्रिकेट दुनिया फॅन होती, तेच गावस्कर धोनीचे फॅन आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


दरम्यान, धोनीही गावसकरांच्या शर्टवर आपली सही दिली आणि दोघांमध्येही एकच स्मितहास्य पाहायला मिळाले. सही मिळाल्यानंतर गावसकरांनी धोनीला मिठी मारली आणि त्यानंतर शुभेच्छा दिल्या.