T20 World Cup 2021: अशी आहे लिटिल मास्टरची T-20 टीम, `या` खेळाडूंना केलं बाहेर
सुनिल गावसकर यांनी आपल्या संघामध्ये मुंबई इंडियन्सच्या चार खेळाडूंना संधी दिली आहे
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार लिटील मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आगामी टी -20 विश्वचषकासाठी आपल्या 15 जणांच्या संघाची निवड केली आहे. आपल्या संघात सुनिल गावस्कर यांनी अनुभवी डावखुरा सलामीवीर शिखर धवनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रोहित आणि विराट कोहलीने विश्वचषकात डावाची सुरुवात करावी असं लिटिल मास्टरचं म्हणणं आहे. (sunil gavaskar picks 15 members team india squad for icc t20 worldcup)
सुनिल गावसकर यांनी आपल्या संघात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) 4 खेळाडूंचा आपल्या समावेश केला आहे. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर तर पांड्या ब्रदर्स हार्दिक आणि कृणाल यांनाही मधल्या फळीत संधी देण्यात आली आहे.
धडाकेबाद फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) गावस्कर यांनी त्यांच्या संघाबाहेर ठेवलं आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात आलं आहे. गावस्कर यांनी संघात तब्बल 5 वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. यात जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.
टीममध्ये यजुवेंद्र चहल या केवळ एका फिरकीपटूला संघात ठेवलं आहे. कृणाल पांड्याबद्दल बोलताना गावसकर म्हणाले 'तो एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. म्हणून तो त्या जागेला पात्र आहे. तो डावखुरा फलंदाज आहे जो फायदेशीर आहे.
भारतीय संघ आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) 24 ऑक्टोबरला दुबईत आपला पहिला सामना खेळणार आहे
सुनिल गावसकर यांची टी-20 टीम
रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंडया, कृणाल पंडया, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दुल ठाकुर आणि यजुवेंद्र चहल