Sunil Gavaskar On Sachin Tendulkar 100 Century Record: आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023) टीम इंडिया जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. श्रीलंकेच्या गोलंदाजांची दैणा उडवून टीम इंडियाने (India Team) विरोधी संघांना आम्ही तयार असल्याचा संदेश दिलाय. शुभमन गिल, इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli), सुर्यकुमार यादव, अक्षर पटेल यांनी मागील काही सिरीजमध्ये धुमधडाका केल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता इंडिया वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता भारताचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (sunil gavaskar says virat kohli may break sachin tendulkar 100 century record marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar On Sachin Tendulkar 100 Century Record) हे त्यांच्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असतात. सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांच्या विक्रमाबद्दल नुकतीच त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय.


काय म्हणाले सुनील गावस्कर?


विराट कोहली (Virat Kohli) जर आणखी 5 किंवा 6 वर्षे खेळत राहिला तर तो 100 शतकांपर्यंत पोहोचेल. तो एका वर्षात सरासरी 6-7 शतके करतो. असं झाल्यास तो 40 वर्षांपर्यंत खेळल्यास पुढील 5-6 वर्षांत आणखी 26 शतके ते 27 शतके जोडू शकतो, असं सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar On Virat Kohli) यांनी म्हटलंय.


आणखी वाचा - Virat Kohli: किंग कोहलीच्या कमबॅकचं रहस्य काय? विराटने 'या' 3 लोकांना दिलं क्रेडिट!


टीम इंडियाचा किंग विराट कोहली आगामी काळात हा विक्रम मोडू शकतो, असं गावस्कर म्हणतात. विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 74 शतके ठोकली आहेत. त्याला सचिनचा विक्रम मोडायचा असेल तर त्याला आणखी 26 शतकांची गरज आहे. विराटने वनडेमध्ये 46 सेंच्युरी (Virat kohli ODI centuries) पुर्ण केल्या आहेत. तर टेस्टमध्ये (Virat kohli Test centuries) विराटच्या नावावर 27 शतक आहेत. तर टी-ट्वेंटीमध्ये (Virat kohli T20 centuries) देखील त्याने 1 शतक ठोकलंय. त्यामुळे आगामी काळात विराट सचिनचा विक्रम मोडीस काढेल, असं मानलं जात आहे.