मुंबई : इंग्लंड विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दावा केला आहे की, विराट कोहलीच्या टीमची परदेशात कामगिरी मागील 15-20 वर्षाच्या टीमच्या तुलनेत खूप चांगली आहे. पण या वक्तव्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्यांना आठवण करुन दिली की, भारताने याआधी वेस्टइंडिज आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरीज जिंकली आहे.  भारताला साउथम्पटनमध्ये 60 रनने इंग्लंड कडून पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर भारतीय टीमवर टीका सुरु झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील गावस्कर हे भारतीय टीमचे माजी खेळाडू आणि कर्णधार सुद्धा होते. त्यांनी भारतीय टीमने मागच्या काळात जिंकलेल्या काही सामन्यांची रवी शास्त्रींना आठवण करुन दिली. गावस्कर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, ''मी हे म्हणू शकतो की, कोणतीही भारतीय टीम याआधी श्रीलंकेमध्ये नाही जिंकली आहे. पण आम्ही वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये जिंकलो आहोत. आम्ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील सामने जिंकले आहेत.''


गावस्करने करुन दिली द्रविडची आठवण


2007 मध्ये द्रविड कर्णधार असताना भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकली होती. ''मी हेच सांगू शकतो की, 1980 च्या दशकात टीमने इंग्लंड आणि वेस्टइंडिजमध्ये विजय मिळवला होता. द्रविडने 2005 मध्ये वेस्टइंडिज आणि 2007 मध्ये इंग्लंडमध्ये सीरीज जिंकली होती. जेव्हा भारताने पहिल्यांदा आफ्रिकेला त्यांच्याच जमिनीवर पराभूत केलं होतं. तेव्हा ते टीमचे कर्णधार होते. राहुल द्रविडला कर्णधार आणि टीमच्या विजयाचं श्रेय दिलं जातं. परदेशात विजय मिळवणाऱ्या अनेक टीम आहे.'' 


गावस्करांची फलंदाजांवर टीका


सुनील गावस्कर यांनी फलंदाजांवर टीका केली आहे. इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाज स्पिनर मोईन अलीच्या बॉलिंगचा सामना नाही शकले. मोईन अलीने 9 विकेट घेतले. त्यांनी म्हटलं की, ''फुटवर्कची कमी आहे त्यामुळे भारतीय फलंदाजांचं मोठं नुकसान झालं. वनडेमध्ये स्लिपला 4 खेळाडू नसतात. जेव्हा गोलंदाज फास्ट बॉलिंग करतो तेव्हा तुम्ही हिट करु शकता.''