Sunil Gavaskar Statement: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) मोठा दणका बसला. खराब गोलंदाजीमुळे टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. तर के एल राहूलची (KL Rahul) फलंदाजी देखील मोठा चिंतेचा विषय राहिला. शिखर धवनला (Shikhar Dhawan) टी-ट्वेंटीमध्ये संधी देण्यात आली नाही. त्याचं नुकसान टीम इंडियाला भोगावं लागलं. अशातच आता भारताचे माजी स्टार खेळाडू आणि लिटल मास्टर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी बीसीसीआयवर (BCCI) निशाणा साधला आहे. (sunil gavaskar statement on shikhar dhawan team india batsman bcci opening combination marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनिल गावस्कर यांनी शिखर धवनसोबत (Sunil Gavaskar On Shikhar Dhawan) अन्याय झाल्याचं वक्तव्य केलंय. आगामी 2023 च्या वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मासह (Rohit-Shikhar) शिखर धवन हा चांगला पर्याय आहे, असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय.


काय म्हणाले Sunil Gavaskar ?


टीम इंडियाला नेहमी उजव्या आणि डाव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाची गरज असते आणि शिखर धवन तुम्हाला तो पर्याय देतो. शिखर धवनकडे खूप अनुभव आहे आणि तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीच्या फलंदाजाची (Team India Opener) भूमिका बजावणारा सर्वोत्तम खेळाडू आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत जागा भरून काढण्यासाठी केवळ पर्याय आहे, पण ती जागा नाही, असं सुनिल गावस्कर म्हणाले आहेत.


आणखी वाचा - IND vs BAN: टीम इंडियाच्या पराभवानंतर DK ला आला राग, 'या' 2 खेळाडूंना झाप झाप झापलं!


दरम्यान, आगामी वर्ल्ड कप 2023 चं यजमानपद भारताकडे (ODI World Cup 2023) असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळपट्टीवर शिखर आणि रोहित शर्मा ही सुपरहिट जोडी ठरू शकते. शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यावर असताना टीम इंडियाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. त्यावेळी शिखरने आपली फलंदाजीचा ट्रेलर बीसीसीआयच्या (BCCI Selectors) सिलेक्टर्सला दाखवून दिला होता.