हा भारतीय खेळाडू झाला बांग्लादेशचा कोच
भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल जोशीचीबांग्लादेशचा स्पिन बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल जोशीचीबांग्लादेशचा स्पिन बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सुनिल जोशीची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताकडून खेळताना सुनिल जोशीनं १५ टेस्ट आणि ६९ वनडेमध्ये ११० विकेट्स घेतल्या होत्या. १९९६ ते २००१ या काळामध्ये सुनिल जोशी भारताकडून खेळला होता. बांग्लादेशचा स्पिन बॉलिंग कोच म्हणून ऑस्ट्रेलियाच्या स्टुअर्ट मॅकगिलला नियुक्त करायचं होतं पण मॅकगिलसोबतची बांग्लादेश बोर्डाची बोलणी फिसकटल्यामुळे सुनिल जोशीची नियुक्ती करण्यात आली.
२००६मध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशमध्ये एकमेव टेस्ट मॅच झाली आहे. त्यानंतर आता ४ सप्टेंबरपासून चिटगाँगमध्ये बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच खेळवली जाईल.